विनंती
हे संकट आहे का? की शेवट...?
अशा अनेक प्रश्नांची मनामध्ये होतेय नांदी
काही जणांना आला आहे अंदाज याचा
तर काही अजुनही करतायेत मस्करीची धुंदी
काल एक होता, आज दहा, तर उदया शंभर
ही बेरीज नाहीये, हा होतोय गुणाकार
आणि प्रत्येक गर्दीची वजाबाकी करुन
त्या दिल्लीपासून ते आपल्या गल्लीपर्यंत करतोय तो भागाकार
घराबाहेर जाऊ नका, घरातच राहा...!
या वाक्यांचा सतत जप होतोय कानांवर
पण काही नमुने सुधरतच नाही
मोठे बाजार काय? साधी टपरी सुद्धा पडलीये बंद
देवाच्या दारालाही लागलय कुलूप
म्हणून मिच माझा रक्षक आहे
आणि हेच सत्य आहे, कितीही असलं कुरुप
डॉक्टर, नर्स, पोलिस आणि कामगार
आपल्या साठीच राबत आहे ना जगात
मग काय फरक पडणार आहे
जर आपण राहिलो त्यांच्यासाठी आपल्या घरात
गोरगरीब आणि मुके जनावरं सुद्धा
भोगत आहे भयंकर हाल
म्हणून डोळे उघडा आणि सज्ज व्हा
तेव्हाच तत्पर राहील आपली माणुसकीची ढाल
Nice ...🤗
ReplyDelete