काही आठवणी, स्वप्न आणि संवाद

 काही आठवणी, स्वप्न आणि संवाद 





आज खुप दिवसांनंतर माळ्यावरून ती सुटकेस उतरवली.
धुळ साचलेली होती जराशी, थोडी मळलेली सुद्धा.
पण सुटकेस मात्र अजुनही जड होती,
आपल्या दोघांच्या आठवणी ज्या ठेवल्या होत्या. 
कपड्यांची घडी उलगडावी तशी एक-एक आठवण मी अलगद उलगडली, 
आणि मला जाणवलं की आपल्या दोघांमध्ये संवाद कधी नव्हताच.
जी होती ती फक्त स्वप्नचं.
दोघेही महत्वाचे होतेचं, कदाचित नसेलही.
असंख्य आठवणींसोबत आपण आपल्या स्वप्नांचा पूल बांधत गेलो.
पण संवादाचा पूल मात्र शब्दांमध्येच हरवून गेला, 
आणि आपण स्वप्नांमध्ये. 
असं वाटतंय जरा अजून थोडा संवाद घडला असता, 
तर आपली स्वप्न आज पूर्ण झाली असती आणि अंतर मिटले असते. 
असो, तुझा हट्ट होता म्हणून मी या आठवणी जपून ठेवल्या होत्या, 
कारण तुला माहीत होतं माझ्याशिवाय यांना कोणीही नीट सांभाळू नाही शकणार. 
अगदी तू सुद्धा. 
आणि हो, आता जर तुला भेटायची इच्छा झालीच तर नक्की भेटू. 
पण यावेळी स्वप्नांच्या नाही, तर सवांदाच्या पुलावर. 

- शुभम आव्हाड


Comments

Post a Comment