नातं आमचं विद्यार्थी शिक्षकापलीकडचं

नातं आमचं विद्यार्थी शिक्षकापलीकडचं


रोजचं जगणं जगत असतांना
पडत होतो, सावरत होतो, मरगळत होतो मी 
कुठेतरी कमी जाणवत होती मला, कुणाचीतरी 
पण कळत नव्हत गर्लफ्रेंड, मित्र कि अजूनकोणी 

एकदा घरी बैचेन असताना, कानावर आलं माझ्या 
कॉलेज मध्ये नवीन सर आलेत शिकवायला 
लगेच गेलो दुसऱ्या दिवशी कॉलेजला, भेटलो नवीन सरांना 
मग मनातल्या मनातच पुटपुटलो, अरे ! हे तर सर नाही मित्रच वाटताय मला 

अगदी चांगल्या प्रकारे ओळख झाली सरांशी 
लेक्चर ही मस्त झाले 
तेव्हा वाटलं होतं मला 
कोणीतरी आपल्याला आपलंसं करणारे आले 


स्वभाव होता सरांचा अगदी मनमौजी 
सेन्स ऑफ़ ह्युमर तर बाप 
कधी कधी खाल्या सरांच्या शिव्याही 
पण लहान भावाप्रमाणे गाईड केले मला, एकदम टिपटाप

अजूनही पाहिलं नाही सरांना कधी कुणावर चिडतांना 
मग विचार केला 
काय पेशन्स असेल त्या माणसाचा 
सॅल्युट त्याच्या विचारांना 

आता तर जरा जास्तच ओळख झाली सरांशी 
एका ताटात जेवण्यापासून ते लेट नाईट किस्यांपर्यंत 
मग मुव्ही बघणं असो किंवा सरांच्या कविता ऐकणं 
तेव्हा उस्ताह मात्र असायचा नितांत 

सरांसोबत अनेक गप्पागोष्टी शेअर झाल्या 
शुभम चं शुभ्या झालं 
पण सरांसाठी आदर इथे ( डोक्यात ) नाही ..... इथे ( मनात ) आहे 
म्हणून विलास सर हे  " सर " चं  राहिलं 

- शुभम आव्हाड 





  

Comments

Post a Comment