सुखांचा पूर
प्रेमाचा तो प्रवाह असतो देखण्याजोगा
जोडून ठेवतो नात्यातल्या भेगा
समाजाचे सारे बांध तोडून
त्या प्रवाहाला मनमुरादपणे वाहण्यासाठी
माझ्या नदीत तुझ्या नदीचा संगम होऊदे
आणि आपल्या आयुष्यात सुखांचा पूर येऊदे
प्रेमथेंबानी चमकत असते संसाराचे घर
आठवणींचा पाऊस अजुन घालतो त्यात भर
एकमेकांचा हात घटट् धरुन
संशयाच्या चिखलाला वाहून जाण्यासाठी
माझ्या नदीत तुझ्या नदीचा संगम होऊदे
प्रत्येक प्रेमी सांधत असतो जाणिवांचा पूल
ऐलतिरि अन पैलतिरि लागतो कधी वेगळाच सुर
दुभंगलेली मने जवळ करून
हर्षाच्या होडीला दिशा देण्यासाठी
माझ्या नदीत तुझ्या नदीचा संगम होऊदे
आणि आपल्या आयुष्यात सुखांचा पूर येऊदे
प्रेम हे असतं लोकांना अप्रूप वाटणारं
कुठल्याही वादळाची पर्वा नसणारं
सात जन्माचे वचन घेऊन
आसुसलेल्या देहांना जवळ करण्यासाठी
माझ्या नदीत तुझ्या नदीचा संगम होऊदे
आणि आपल्या आयुष्यात सुखांचा पूर येऊदे
Comments
Post a Comment