थंडी आणि बरंच काही
गुलाबी थंडीची पहाट झाली
तिरिप उन्हाची धुक्यातून आली
स्वेटर, चादर, थोडं प्रेम घेऊन
सोबत आहे दोघांची जोडी
डोंगर, दऱ्या अन गाव फिरतांना
गरमागरम कॉफीसोबत विंटर रोमान्स करुया
आणि पुन्हा नव्याने एकाच हृदयाचे भाडेकरू होऊया
खोडकर थंडीचा बेधुंद वारा
छेडून गेला स्वपनांच्या तारा
उबदार दुलई लपेटून
शेकोटी समोर तळहात घासत
तुझी माझी लव्हस्टोरी उजळतांना
गरमागरम कॉफीसोबत विंटर रोमान्स करुया
आसमंत कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये
गरम आहेस तु ही
गरम झालोय मी सुद्धा
अंगावर पडलेल्या दवबिंदुना
हळूच ओठांनी पुसतांना
गरमागरम कॉफीसोबत विंटर रोमान्स करुया
आणि पुन्हा नव्याने एकाच हृदयाचे भाडेकरू होऊया
अनेक झाल्या कविता ऊनपावसावर
आहे हा अन्याय थंडीवर
गुलाबी आहे थंडी काहींसाठी
तर काहींसाठी रंगीबेरंगी
अशीच थंडीवर कविता लिहितांना
गरमागरम कॉफीसोबत विंटर रोमान्स करुया
आणि पुन्हा नव्याने एकाच हृदयाचे भाडेकरू होऊया
Comments
Post a Comment