त्या संध्याकाळी

त्या संध्याकाळी 


दिवस होता मावळतीचा 
रात्र होती परतणारी 
तुझी आणि माझी संध्याकाळ 
होती रम्य भावणारी 

गेला होता तो रवि 
आणि विरलं होतं उनही 
सावली होती सोबतीला 
माझी तुला, तुझी मला तेव्हाही  

होता चंद्र साक्षीला 
अन चमकणारी चांदणी 
त्या शुभ्र प्रभातून न्हाऊन निघाली 
होती तु जशी रुप साजणी


कानावर ऐकू येत होती  
धुंद शांत वाऱ्याची बासरी 
पाघळत होता जीव माझा 
जाणून तुझ्या स्मित हस्यातील गोजिरी 

माळलेली होती तुझ्या केसांमध्ये
सुगंध दरवळणारी मोगऱ्याची कळी 
पण गजऱ्याचा मालक होतो मी 
बनवला होता तो वेचून वेचून  पाकळी

बस ! आता पुरे झाले 
काढून जुन्या आठवणी 
आधार मिळतोय जीवाला 
आणि त्रास होतोय क्षणोक्षणी 

अजुनसुद्धा आहे फोटो तो 
काढतोय, पुसतोय, ठेवतोय वेळोवेळी 
आठवतयनां, काढला होता तेव्हा तूच 
त्या संध्याकाळी ....... 

- शुभम आव्हाड    




Comments