एक पाखरू
एक होतं पाखरू
खुप प्रेम होतं त्याचं जीवनावर
मन अगदी निर्मळ त्याचं
जगत होतं माणुसकीच्या झाडावर
एके दिवशी घेतली झेप त्याने गगनात
होऊन स्वार वाऱ्यावर
नाती जपत होतं मात्र ते
पत्करून धोका पाऊला-पाऊलावर
पाहून श्रृंगार त्याचा
पडली काहींची नजर त्याच्यावर
होते ते समाजातील गिधाडं
काळाकुट्ट अंधार होता त्यांच्या अंत:करणावर
भुलवलं त्यांनी इवल्याश्या पाखराला
नेलं दूर अंतरावर
ओरबाडली त्याची नाजुक, कोमल पिसं
आणि उडवले शिंतोड़े त्याच्या अब्रुवर
कासाविस झालेलं पाखरू म्हणालं
" सोडा मला, दया करा माझ्यावर "
पण गिधाडांची जातचं होती हैवान
त्यांनी वार केला त्याच्या काळजावार
सोडला प्राण पाखरानं
झाला विजय वाईटाचा चांगल्यावर
माणुसकीच्या झाडानेही घेतला पेट
संपवून आशा पाखराच्या परतण्यावर
भुलवलं त्यांनी इवल्याश्या पाखराला
नेलं दूर अंतरावर
ओरबाडली त्याची नाजुक, कोमल पिसं
आणि उडवले शिंतोड़े त्याच्या अब्रुवर
कासाविस झालेलं पाखरू म्हणालं
" सोडा मला, दया करा माझ्यावर "
पण गिधाडांची जातचं होती हैवान
त्यांनी वार केला त्याच्या काळजावार
सोडला प्राण पाखरानं
झाला विजय वाईटाचा चांगल्यावर
माणुसकीच्या झाडानेही घेतला पेट
संपवून आशा पाखराच्या परतण्यावर
Comments
Post a Comment