तुला पाहिले

तुला पाहिले


ओठांवरती बोल तुझे जणू रूप मोती 
आयुष्याच्या वाटेवर जुळली आपली नाती

स्पर्श तुझा होताच मी न माझा राहिलो
सावली बनून क्षणोक्षणी तुझ्या मनात विरलो

कधी तू, कधी मी आपले संपुर्ण प्रेम हे
तू माझी अन मी तुझा नाते नवे स्वच्छंद हे

सायंकाळी ऊन ढळले होते जिथे
पाहिले होते मी तुला पहिल्यांदा त्या वाटेवर तिथे


तू नसतांना असल्याचा भास होतो मला
तुजविण या जीवनात अर्थ नाही उरला 

दूर नको तू आता होऊ प्रेम माझे बोलते
तेच प्रेम सदा माझ्या हृदयात वसते

तुला पाहिले होते मी कवितेचे शब्द संपन्न होतांना
तुला पाहिले होते मी, तू कवितेचा विषय होतांना


शुभम आव्हाड



Comments