तू ....


तू श्रावण पाऊलात चालत आलीस 
तू धुके होऊन विरुन गेलीस 
तू फुलांच्या सड्याने बहरलीस 
तू पावसाच्या सरीने बरसून गेलीस 

हृदयाचा माझ्या श्वास होऊन 
सुखांची तू लहर झालीस 


तू पहाटेच्या उन्हात चमकलीस 
तू चंद्र प्रकाशात सावरुन गेलीस 
तू इंद्रधनू परी झालीस 
तू धुंद हवेत मिसळून गेलीस 

चांदण्यांच्या रोमरोमांत वसून 
मितवा तू माझी झालीस 

तू कळी होऊन फुल झालीस
तू मातीच्या गंधात हरवून गेलीस
तू दाही दिशांचा सूर झालीस
तू लांब अंतराच्या वाटेवर आलीस

तूझी हाक मला ऐकु आली 
पण मागे पाहताच, तू दूर निघून गेलीस

- शुभम आव्हाड 


Comments